पुण्यामध्ये दोन पोलिसांकडून व्यावसायिकाची लूट
कार अडवून तब्बल १ कोटींची लूट केल्याची माहिती
या प्रकरणी दोन्ही पोलिसांचे निलंबन करण्यात आले
प्रमिला निकम आणि अजित मेस्त्री यांच्यावर कर्तव्यात कसुरीचा ठपका
Pune Police: पुण्यातील व्यावसायिकाचे १ कोटी लुबाडल्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खेड शिवापूर पोलिस चौकीतील २ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री यांचं निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला निकम आणि अजित मेस्त्री या २ पोलिसांनी कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुणे शहरातील नवले पुलाजवळ व्यावसायिकाचे १ कोटी रुपये लुबाडण्याच्या प्रयत्नात या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. नऱ्हे पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची कार अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली होती. हा दरोडा दुसरं तिसरं कुणी नसून पोलिसांनी केल्याचं उघड झाले. या दरोड्याच्या गुन्ह्यात नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्या होत्या. तर ग्रामीण पोलिस दलातील राजगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलिस चौकीतील एका महिला पोलिस हवालदारासह पोलिस शिपायाला सहआरोपी करण्यात आले. सध्या हे दोन्ही पोलिस फरार आहेत.
ही सगळी घटना १८ जुलै रोजी पुण्यातील नवले पूल परिसरात घडला. फिर्यादी पवार हे सहकारी किरण आपटे यांच्यासह एका कारने नवले पुलाजवळ असलेल्या बँकेच्या दिशेने जात असताना काही जणांनी त्यांची कार अडवली. “आम्ही पोलिस आहोत, तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात,” असे सांगत आरोपींनी कारचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले आणि कारमधील एक कोटी रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला.यावेळी आपटे यांनी ७३ लाख रुपयांची बॅग घेऊन ते निघून गेले आणि ही रक्कम वाचली.
यानंतर आरोपींनी पवार यांच्या कारममध्ये बसून त्यांना थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत नेलं. त्याठिकाणी त्यांच्या ताब्यातील दुसऱ्या बॅगेतील २६.५० लाख रुपयांपैकी २० लाख रुपये काढून घेण्याचा प्रयत्न झाला. महिला पोलिसाच्या मदतीने आणि एका पत्रकाराने ती रक्कम स्वत:च्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली मात्र प्रकरण आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी ती रक्कम पुन्हा बॅगेत ठेवली. खेड शिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.