Health Department Recruitment Exam | अधिकाऱ्यांनी फोडला आरोग्य भरतीचा पेपर Saam Tv
मुंबई/पुणे

आरोग्य भरती घोटाळ्यात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; जॉईंट डायरेक्टरला घेतलं ताब्यात

भर्ती घोटाळ्याचे धागेदोरे थेट आरोग्य मंञालयात पोहोचले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : आरोग्य भरती प्रकरणी रोज अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात येत आहे. पुणे सायबर कारवाईत करणे सुरु आहे. मात्र आज आरोग्य पेपर फुटीचे धागेदोरे थेट आरोग्य मंञालयात पोहोचले आहेत. आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टरच्या अधिकाऱ्याला घेतलं ठाण्यातून ताब्यात आहे. या अधिकाऱ्याकडे सध्या जॉईट डायरेक्टर पदाचा अतिरिक्त पदभार आहे. महेश बोटले या अधिकाऱ्याची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सध्या मिळत माहितीनुसार, चौकशीअंती त्यांना अटक होऊ शकते.

आरोग्य विभागामार्फत (Health Department) गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबरच्या रात्रीच फुटल्याचा प्रकार घडला होता. याबद्दलची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. याच पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांकडून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीच पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका संशयीताला (ता. १ डिसेंबर) रोजी ताब्यात घेतलं होत. त्यानंतर आरोग्यभरती प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणी आणखी आरोपी ताब्यात घेतले होते. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली होती. याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक झाली झाली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गैरप्रकार झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांसह राज्यातल्या विरोधी पक्षाने या परीक्षेतील सावळ्या गोंधळावरून राज्य सरकारला आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना धारेवर धरले होते.

आरोग्य विभागामार्फत गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबर च्या रात्रीच फुटल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली. सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ उडाला होता. पेपर फुटीच्या या गंभीर प्रकाराने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. फुटलेल्या पेपर मधील १०० पैकी ९२ प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT