Pune police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police : कोयता गँगविरोधात पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दहशत पसरवणाऱ्या गुडांवर केली कारवाई

Pune Police Alert Mode : काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगवरुन पुणे पोलीस आयुक्ताचे कान टोचले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक पवित्रा आकारल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Police News : काल पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन सुनावले होते. त्यातही कोयता गँगला आवर घालण्यावरुन पवार यांनी पोलिसांना सूचनादेखील दिल्या होत्या. यामुळे पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे म्हटले जात आहे.

पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांना त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन पोलिसांनी सज्जड दम दिला. वाहनांची तोडफोड केल्यास धिंड काढली जाईल आणि चौकात जाहीरपणे फटके दिले जातील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गोळीबार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जप्त केला आहे.

वाहन तोडफोडीच्या घटनांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे पुण्याचे पोलीस आयुक्तांना दम भरला होता. 'पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा, कोयता गँगचा बंदोबस्त करा. मकोका लावा काय करायचे ते करा. आम्ही तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही', असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.

'आरोपीला पकडल्यावर त्याची शहरात अशी धिंड काढा. अख्या शहराला कळलं पाहिजे चुकल्यावर काय होतं ते' असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. काल केलेल्या सूचनांची अंमलबजावणी आजपासूनच करायला पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिसांनी दहशत करणाऱ्यांची मिरवणूक काढून सज्जड दम भरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT