Pune Sancheti Bridge Protest Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: संचेती पुलावर 'शोले स्टाईल' आंदोलन करणं तरुणाला पडलं महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

तरुणाला हे आंदोलन महागात पडलं आहे. संचेती पुलावर काल चढून बसून आंदोलन केलेल्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Prachee kulkarni

Pune News: पुणे शहरात काल झालेल्या एका शोले स्टाईल आंदोलनाची जोरदार चर्चा रंगत आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या संचेती रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले होते. मात्र, तरुणाला हे आंदोलन महागात पडलं आहे. संचेती पुलावर काल चढून बसून आंदोलन केलेल्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

काल पुण्याच्या संचेती रुग्णालयासमोरील पुलावर चढून एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले होते. महेंद्र देवकर असे या तरुणाचे नाव असून तो जुन्नर तालुक्यातील सुलतानपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तरुणाने हे आंदोलन छेडले होते. दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

वारंवार अर्ज देऊनही जमिनीच्या खातेदाराच्या नावाच्या नोंदी केली नाही असा आरोप करत देवकर याने तहसीलदारांविरोधात आंदोलन छेडले. यावेळी त्याने जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. मी पुलावरुन उडी मारणार, असा पवित्रा घेतला होता. या तरुणाच्या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पुलावर चढून आंदोलन करणे तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे.

संचेती पुलावर चढून बसलेल्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ३०९ आणि १८९ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संचेती पुलावर चढून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जुन्नर तहसीलदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी तरुण पुलावर चढला होता. या तरुणावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कारवाई होतेय, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT