पुणे पोलिसांनी अखेर किरण गोसावीच्या मुसक्या आवळल्या सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुणे पोलिसांनी अखेर किरण गोसावीच्या मुसक्या आवळल्या

कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणामधील पंच असलेला किरण गोसावी हा मागील अनेक दिवसांपासून फरार होता.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणामधील पंच असलेला किरण गोसावी हा मागील अनेक दिवसांपासून फरार होता. तसेच त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या हातावर नेमहीच हातावर तुरी देत तो फरार झाला होता.

हे देखील पहा-

किरण गोसावीने लखनऊ पोलिसांना शरण जाण्याकरिता विनंती केली होती. पण त्यांनी त्याला नकार दिला होता. त्या संभाषणाच्या आधारे पुणे पोलिसांची एक तुकडी त्याला पकडण्याकरिता लखनऊला रवाना झाले होते. पण तो तिथुनही पोलिसांना चकवा देत फरार झाला आहे.अखेर पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार सध्या किरण गोसावी हा पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या प्रकऱणात किरण गोसावीवर ड्रग्ज प्रकरणातील चौकशीशी संबंधित अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. किरण गोसावीने आर्यन खान प्रकऱणात पैसे घेतल्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला आहे.

त्यानुसार आता पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. या चौकशीत नेमके काय निष्पन्न होणार?, हे बघने महत्त्वाचे ठरणार आहे. आणि त्याला दुपारी कोर्टत हजर करणार आहेत. या बाबतची माहिती सहपोलीस आयुक्त रवींद्र सिसवे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT