Pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : टेक्निशियनला पैशांची चणचण; थेट कंपनी मालकाच्या घरात घुसला, मारला ४३ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला

Pune Crime update : टेक्निशियने कंपनी मालकाच्या घरात घुसून चोरी केली. चोरट्याने तब्बल ४३ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारला.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्याने मालकाच्या घरातून थेट लाखोंचे सोने आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले आहेत. पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाच्या घरात घुसून चोरट्याने ४८ तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले. चोरट्याने पुण्यातील हडपसरमध्ये १७ मे रोजी घरफोडी केली होती. स्पोर्ट्स बाईकमुळे आरोपीचा सुगावा लागला. टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून ४३ लाख रुपयांचे सोने, हिऱ्याच्या दागिन्यांसह चांदी जप्त केली आहे. रोहित विलास अंधारे (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीचा हा प्रकार १७ मे रोजी रात्री ९ वाजता पुण्यातील हडपसर भागातील एका इमारतीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील एका रहिवासी इमारतीत सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाच्या एका फ्लॅटमध्ये चोरट्याने बेडरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर या घरातील सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवाई यांना हडपसर भागात गस्तीवर असताना एक स्पोर्ट्स बाईक संशयास्पद पार्क केलेली आढळून आली. पोलिसांनी तिचा क्रमांक नोंद करून घेतला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी निरीक्षक यांना चोराने याच बाईकचा वापर केल्याचे लक्षात आले.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीसीटीव्ही तपासून आरोपीचा सोलापूर, बार्शी, धाराशिव, भुम परांडा याठिकाणी शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना याच भागात चोरटा आढळला. आरोपी पुण्यागील मांजरी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून अटक केली. रोहित विलास अंधारे हा मूळचा धाराशिव जिल्ह्याचा असून सध्या पुण्यातील खराडी भागात टेक्निशियन म्हणून काम करत होता.

पोलिसांनी अंधारेकडून ४३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ४८ तोळे वजनाचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी आणि मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT