Pune Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! टेम्पोने 6 वाहनांना दिली धडक, घटना CCTV त कैद

Pune Accident CCTV : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! टेम्पोने 6 वाहनांना दिली धडक, घटना CCTV त कैद

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

Pune Accident News:

पुण्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. पुणे कोलाड महामार्गावर पिरंगुट घाटात टेम्पोने सहा वाहनांना दिली धडक दिली आहे. यात सात जण नेहमी झाले असून जीवित हानी टळली आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. ज्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौंड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे कोलाड महामार्गावर पिरंगुट येथील घाट उताऱ्यावर बाजूला सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पो ने पाच दुचाकी व एका चार चाकी वाहनांना धडक दिली आहे.  (Latest Marathi News)

अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपली स्कूटर काढत असताना अचानक भरधाव टेम्पो येतो आणि त्यासह सहा वाहनांना धडक देतो. टेम्पो त्याकडे येत असल्याचे पाहून तो थोडा सावध होतो आणि वेळीच स्कूटर सोडून जवळच उभ्या असलेल्या दोन कारच्या मधल्या जागी उडी घेतो.

मात्र या अपघातात रस्त्यावर चालणारे आणि आणखी एक स्कूटर चालकासह सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT