Pune Pimpari Chinchwad Crime Two-wheeler thief arrested by Bhosari Police 16 Bikes seized  Saamtv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad Crime: भोसरी पोलिसांची मोठी कारवाई! अट्टल दुचाकी चोरट्यास ठोकल्या बेड्या; तब्बल १६ गाड्या जप्त

Pune Crime News: राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून तीन लाख 84 हजार रुपये किमतीची16 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Crime:

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. योगेश शिवाजी दाभाडे असं दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच नाव असून, त्याच्या ताब्यातून भोसरी पोलिसांनी चोरीचे 16 दुचाकी वाहन जप्त केले आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, योगेश शिवाजी दाभाडे हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक पोलीस आयुक्तालय, नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि धुळे ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याने जवळपास 17 मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत.

या प्रकरणात भोसरी पोलीस त्याचा शोध घेत होते. अशातच योगेश शिवाजी दाभाडे हा भोसरीतील गाव जत्रा मैदान या ठिकाणी येणार अशी गोपनीय माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत योगेश शिवाजी दाभाडे याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या ताब्यातून तीन लाख 84 हजार रुपये किमतीची16 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे शहरातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बुधवारी गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयत्याने हल्ला (Attack With Koyta) झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयत्याने हल्ला करणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT