Pune Parking Dispute  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: कोंढव्यात पार्किंगचा वाद! भररस्त्यात तरुणांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर धारधार शस्त्रांनी वार

Pune Parking Dispute: पुण्यामध्ये कार पार्क करण्यावरून दोन तरुणांमध्ये तुफान राडा झाला. दोघांनी भरचौकात एकमेकांवर धारधार शस्त्रांनी वार केले. यामध्ये दोन्ही तरुण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

Priya More

पुण्यातील कोंढव्यामध्ये पार्किंगवरून तुफान राडा झाला. दोन तरुणांनी धारधार शस्त्रांनी एकमेकांवर वार केले. या घटनेमध्ये दोघेही जखमी झाले आहेत. यामधील एक व्यक्ती कोंढवा परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार आहे. त्याने आपल्या गाडीला पोलिस पाटी लावली होती. पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसर बाग येथे गणेश पसर (32 वर्षे) या तरुणाने रस्त्यावर कार पार्क केली होती. कार पार्किंगवरून वाद झाला. अफाक आशफाक शेख (30 वर्षे) या तरुणाने गणेश पसरला कार पार्क करण्यास अडवले. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी दोघांनी एकमेकांवर धारधार शस्त्रांनी वार केले.

या हल्ल्यामध्ये दोन्ही तरुण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतलं. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले. दोघांवर देखील उपचार झाल्यानंतर त्यांचे जबाब घेण्यात आले. याप्रकरणी दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांना कारमध्ये हत्यारे सापडली.

गणेश पसरे याच्याविरोधात 109, 115(2), 352, 3(5) सह 37(1), 135 सह, क 3, 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अफाक शेखविरोधात 109, 115(2), 352, 3(5) सह Arm Act क 4, 25 सह मपोका क 37(1), 135 सह, क 3,7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोंढव्यात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT