Hit and Run Case Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Hit & Run Case : मॉर्निंग वॉक करताना पुण्यात तरुणाला उडवलं, आरोपी चालकाला काही तासात बेड्या; कारची नंबरप्लेट...

Pune Hit and Run Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात न्याती ईबोनी सोसायटीजवळ, उंड्री येथे घडला. सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग असं अपघातात मृत्युमूखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

Prashant Patil

पुणे : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघाताचे काही धक्कादायक फोटो देखील समोर आले होते. घटनास्थळी कोणतेही वस्तू न सापडल्याने मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नव्हती. हा अपघात कसा झाला याचा शोध पोलीस घेत होते. अखेर पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात कारचालकाला तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. समीर गणेश कड असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मृत तरुणाची ओळख देखील पटलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात न्याती ईबोनी सोसायटीजवळ, उंड्री येथे घडला. सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग असं अपघातात मृत्युमूखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी तात्काळ त्या चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आजूबाजूचे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडी घटनास्थळावरुन जाताना दिसली.

गाडीचा नंबर एमएच १२ एक्सएच ५४३४ असा असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, अवघ्या १० तासात या गाडी मालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. अधिक तपास केला असता आरोपीने गाडीचे दोन्ही बाजूची नंबर प्लेट काढून ती औताडेवाडी पुणे येथील निर्जनस्थळी लपवून ठेवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT