Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गँगची पुन्हा दहशत, भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या

Pune Police: खडकवासला येथे एका तरुणावर भरदिवसा कोयता गँगने जीवघेणा हल्ला केला. सतीश थोपटे यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडीत कोयता गँगने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. खडकवासला येथे एका तरुणावर भरदिवसा कोयता गँगने जीवघेणा हल्ला केला. सतीश थोपटे यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हवेली पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. नुकताच व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच आज पुन्हा खडकवासल्यातील कोल्हेवाडी येथे भर दिवसा एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे.

सतीश थोपटे (४० वर्षे) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते खडकवासलाच्या कोल्हेवाडी येथील रहिवासी होते. सतीश थोपटेंची हत्या करून हल्लेखोर पसार झाले. आज दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे राहणारे सतीश थोपटे यांच्यावर याच ठिकाणी चार अज्ञातांनी कोयत्याने पाठलाग करत हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या थोपटे यांचा मृत्यू झाला.

भरदिवसा गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा हल्ला कोणी केला आणि का केला? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याच आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT