Pune Fake Currency Case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: रात्रीच्या अंधाराचा घ्यायचा फायदा, १ लाखांच्या बनावट नोटासह तरुणाला अटक

Pune Fake Currency Case: पुण्यामध्ये १ लाख २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात बनावट नोटांचे प्रकरण समोर आले आहे. बनावट नोटांद्वारे एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा तरुण या नोटांचा चलनामध्ये वापर करत होता. या तरुणाकडून पोलिसांनी १ लाखांपेक्षा जास्त पैसे जप्त केले आहेत. निलेश विरकर असं या तरुणाचे नाव असून सहकारनगर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना पुणे -सातारा रोडवरील प‌द्मावती बसस्टॉपसमोर एक व्यक्ती गडबडीने स्वारगेटचे दिशेने जाताना पोलिसांन दिसला. पोलिसांना या तरुणाच्या हालचालींवर संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला थांबवले. त्याच्याकडे त्याचं नाव विचारले असता त्याने तो चिंचवडमध्ये राहत असल्याचे सांगितलं आणि गडबडीत निघून जाण्याचा त्याने प्रयत्न केला

पोलिसांनी या तरुणाकडे अजून चौकशी केली असता तो त्याच्या खिशात काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याची हालचाल संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आहे. त्यांनी त्याचे खिसे तपासले असता त्यामध्ये त्यांना बनावट नोटा असल्याचे निष्पन्न झाले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हा तरुण या नकली नोटा चलनात वापरत होता. त्याने पोलिसांनी ही माहिती दिली

पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. निलेश विरकर असं या तरुणाचे नाव असून सहकारनगर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी १ लाख २५ हजारांच्या ५०० रुपयांच्या एकूण २५० नकली चलनी नोटा जप्त केल्या. यामागे रॅकेट सक्रिय आहे का याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Wash Tips: दोन, तीन की दररोज...; आठवड्यातून नक्की किती वेळा केस धुवावे

Hairstyles For Long Face Women: नेहमीच्या हेअर स्टाइल्स विसरा; ट्राय करा 'या' आकर्षक अन् युनिक Hair Styles, तुम्हीच दिसाल सुंदर

Sunday Horoscope: पैशाची तंगी भासेल, 'या' राशीच्या लोकांनी डोकं ठेवा शांत; वाचा रविवारचे राशीभविष्य

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत १०,००० कोटींचा महाघोटाळा, महाराष्ट्रात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडच्या महाडमध्ये राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शिंदे सेनेचे आंदोलन

SCROLL FOR NEXT