Pune Viral News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुणे तिथे काय उणे! ‘आमच्याकडे‘ लायसन्स आहे, वेळ वाया घालवू नका!’ वाहतूक पोलिसांना पुणेरी भाषेत टोमणे

Pune Viral News : वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असताना शांत राहतील ते पुणेकर कसले.

Satish Daud

सचिन जाधव

Latest Pune News : पुणे तिथे काय उणे म्हटलं जातं. त्यामुळेच पुण्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. मार्च महिन्याच्या अखेरीस पुण्यात वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई सुरू केली. शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड आकारला. पण, पोलिस कारवाई सुरू असताना शांत राहतील ते पुणेकर कसले. (Latest Marathi News)

'आमच्याकडे लायसन्स आहे, त्यामुळे आम्हाला थांबवून तुम्ही आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका,' असा मजकूर असलेला फलक हाती घेऊन पुण्यातील तरुणाने पोलिसांना पुणेरी भाषेत टोमणे मारले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुण्यात (Pune News) वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून सध्या शहरातील चौकाचौकात दुचाकीस्वारांना थांबवून जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या पुणेकर तरुणाईने मुठा नदीपात्रात इन्टाग्रामच्या माध्यमातून एक रील्स तयार केले आहे. त्यात त्यांनी दुचाकीवरून जात असताना वारंवार गाडी बाजूला घेण्यास सांगणार्‍या वाहतूक पोलिसांना टोमणे मारले आहेत.

यात दोन तरुण दुचाकीवरून जाताना आणि नदीपात्रातील घाटावर एक फलक हाती घेतलेले दिसत आहेत. त्या फलकावर 'लायसन्स आहे, थांबवून आमचा आणि तुमचा वेळ घालवू नये,' असे लिहिलेले आहे. या व्हिडीओला 'आम्ही पुणेरी…'हे गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, तरुणांनी हा स्टंट केला असला तरी, पुणे शहर वाहतूक पोलीस (Pune Police) आयुक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ठाम आहेत. पुणेकर शहरात पोलीस म्हणून किंवा इतर असा वेगळा न्याय दिला जात नाही तर गेले १५ दिवसात सर्वाधिक नियम मोडले म्हणून जवळपास ३९२ कारवाई पोलिसांवर केल्या असल्याच सांगत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT