Pune Police saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police: २ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ

Pune Police Officers Suspended: पुणे पोलिस दलामध्ये खळबळ उडाली. दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे लाच घेताना तडकाफडकी निलंबन करण्यात आले. दोघांना २८ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

Priya More

Summary -

  • पुणे पोलिस दलात खळबळ उडाली

  • दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन

  • दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते

  • २८ लाखांची लाच घेताना त्यांना पकडलं होतं

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये २ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे तकाफडकी निलंबन करण्यात आले. एकाच दिवशी २ लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. यामुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली. यामध्ये एपीआय वैशाली तोटेवार आणि पीएसआय मनोज बरुरे यांचा समावेश आहे. एका पाठोपाठ सलग दोन दिवस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलिस दलात कारवाई करुन २ पोलिस अधिकार्‍यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर दोघांनाही पुणे शहर पोलिस दलातून निलंबित करण्यात आले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार आणि पोलिस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुरे या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. वैशाली तोटेवार यांना १ मे रोजी पोलिस निरीक्षक, लोहमार्ग, मुंबई या पदावर रुजू होण्यासाठी पदोन्नतीवर कार्यमुक्त करण्यात आले होते. वैशाली तोटेवार यांनी खासगी व्यक्तीच्या मार्फत कोंडऱ्याड हॉटेलच्या परिसरात २७ लाख रुपयांची लाच स्वीकारली. यावरुन तुमची बेईमानी वृत्ती दिसून येते, त्यामुळे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी वैशाली तोटेवारला निलंबित केले आहे.

एका १७ वर्षांच्या मुलावर लोहगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी त्यांच्याकडे ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. लोहगाव पोलिस ठाण्यात ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मनोज बरुरे यांना रंगेहात पकडले होते.

कर्तव्य बजावत असताना केलेल्या अत्यंत गंभीर, भ्रष्टाचारी आणि नैतिक अध:पतनाने पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होईल, असे अशोभनीय गंभीर गैरवर्तनामुळे अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना निलंबित केले आहे. लागोपाठ २ दिवस या दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले गेल्याने आणि त्यांना एकाच दिवशी निलंबित केले जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT