pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Nylon Manja : पुण्यात नायलॉन मांजामुळे पोलिसाचा गळा चिरला; थोडक्यात बचावले दुचाकीवरील २ पोलीस कर्मचारी

पुण्यात नॉयलॉन मांजावर घातलेले बंदीचे आदेश धुडकावून संक्रातीला पतंगबाजी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पुण्यात नॉयलॉन मांजावर घातलेले बंदीचे आदेश धुडकावून संक्रातीला पतंगबाजी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नॉयलॉन मांजामुळे दुचाकीस्वार दोन पोलीस जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नॉयलॉन मांजामुळे जखमी झालेल्या घटनेत पोलीस (Police) कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी असे त्यांची नावे आहेत. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत.

रविवारी दुचाकीस्वार पवार आणि गवळी पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्या वेळी मांजा (Manja) मानेला अडकल्याने पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. त्यांच्याबरोबर असलेले सहकारी गवळी यांचा हात मांजामुळे चिरला आहे.

मकरसंक्रांत निष्पाप पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतली

मुंबई (Mumbai) परिसरातील ६४ पक्ष्यांसाठी ‘संक्रांती’चा दिवस घातक ठरला. मांजामुळे मुंबईत मकरसंक्रांतीच्या दिवशी ६४ पक्षी जखमी झाले आहेत. अनेक पक्ष्यांचे पंख कापले तर काहींचे पाय कापले गेले आहेत. जखमी पक्षांवर अम्मा केअर फाउंडेशन, प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी - मुंबई तर्फे या पक्ष्यांवर उपचार करण्यात आले.

रविवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने इमारतीच्या गच्च्या, मैदाने, मोकळय़ा जागांवर पतंगबाजी रंगली होती. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आलेला मांजा हा अनेक पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरला आहे. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानी पतंगबाजीचा आनंद लुटला असला तरी हा आनंद अनेक पक्ष्यांच्या जीवावर बेतला.

या जखमी पक्ष्यांमध्ये एक पळस, मैना , शरटी, घुबडे, कोकिळा, कबुतरे असे पक्षी जखमी झाले. मात्र, यामध्ये सर्वाधिक कबुतरे होती. पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या ५७ कबुतरांवर उपचार करून त्यांना कबुतरखान्यात सोडण्यात आले. तर जखमींपैकी सात पक्षी गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोन घारी, दोन कोकिळा, दोन कबुतरे आणि एक घुबडीचा समावेश आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? हे उपाय खुलवतील तुमचं हास्य

SCROLL FOR NEXT