Pune Police Attack  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित, बाईक अडवली म्हणून वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घातला

Pune Police Attack News : पुण्यातल्या भेकराईनगर चौकात एका बाईकस्वाराने वाहतूक पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला केला. बाईक अडवल्याच्या रागातून त्याने हवालदाराच्या डोक्यात दगड घातला.

Yash Shirke

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Police Attack : पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक पोलिसांवर एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यामध्ये वाहतूक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात घडला. एक व्यक्ती फोनवर बोलत बाईक चालवत होता. तेव्हा तेथील वाहतूक पोलीस हवालदाराने बाईकस्वाराला अडवले. या गोष्टीचा राग बाईकस्वाराला आला आणि त्याने हवालदारावर प्राणघातक हल्ला केला. हल्ला करुन बाईकस्वार पळून गेला.

जखमी वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव राजेश गणपत नाईक असे आहे. राजेश यांनी बाईक चालवत असताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले. यावर संतापलेल्या बाईकस्वाराने राजेश यांच्याशी वाद घातला. रागात त्याने बाईकस्वाराने राजेश यांच्यावर हल्ला केला. त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात जोरात घातला.

हल्ला झाल्यानंतर पोलीस हवालदार राजेश नाईक गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान हल्ला करणारा आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात पोलीसच सुरक्षित नसल्याचे लोक म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT