Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: कोयता घेऊन माजवत होते दहशत; टोळीची कॉलेजमध्येच काढली धिंड

कोयता घेऊन माजवत होते दहशत; टोळीची कॉलेजमध्येच काढली धिंड

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : महाविद्यालयाच्‍या आवारात कोयता व सुरा घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्‍न केला जात होता. शिवाय (Pune News) महाविद्यालयातील विद्याथ्‍र्यांना देखील धमकवले जात होते. या टोळीला पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेत त्‍यांना अद्दल घडवायसाठी महाविद्यालयात धिंड काढली. (Latest Marathi News)

पुणे शहरातील एका नामांकित कॉलेजमध्‍ये हा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात भररस्‍त्‍यावर तरूणीवर कोयत्‍याने वार केल्‍याचा प्रकार गेल्‍या आठवड्यात झाला. यानंतर देखील महाविद्यालयाच्‍या आवारात कोयदा व सुरा घेवून दहशत निर्माण करण्याची हिंमत तरूणांनी केली. मात्र कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या टोळक्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

टोळीची कॉलेजमध्येच धिंड

पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधील विद्यार्थ्यांना (Pune Police) धमकावले जात होते. विद्यार्थ्यांना धमकावणे तसेच त्यांच्याकडून पैश्याची मागणी करणे असे कृत्य ही टोळी काही दिवसांपासून करत होती. यातील २ जण हे त्याचं महाविद्यालयात शिकायला आहेत. सदर प्रकार पोलिसांना समजल्‍यानंतर धमकवणाऱ्या या टोळीला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. यानंतर ९ जणांची पोलिसांनी महाविद्यालयात धिंड काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

SCROLL FOR NEXT