Pune Crime News Youth Beaten Girl 
मुंबई/पुणे

धक्कादायक! पळत पळत पाठलाग, नंतर केस धरून ओढलं; निर्मनुष्य रस्त्यावर युवतीला मारहाण| Video Viral

Pune Crime News Youth Beaten Girl: पुण्यातील वारजे परिसरातील एका रस्त्यावर एका मुलाने मुलीला मारहाण केल्याची घटना घडलीय. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

हुंड्यासाठी एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. वैष्णवी हगवणे प्रकरणावरून सरकारवर विरोध टीका करत आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पुण्यातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओनं खळबळ माजलीय. पुण्यातील वारजे परिसरात एका तरुणाने निर्मनुष्य रस्त्यावर एका मुलीला मारहाण केल्याची घटना घडलीय.

वारजे परिसरातील निर्मनुष्य रस्त्यावर एका युवकाने युवतीला मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत. हे युवक आणि युवती कोण आहेत याची ओळख पटली नाहीये. पोलीस व्हिडिओच्या आधारे शोध घेत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, युवक आणि युवती दोन्ही एकमेकांच्या ओळखीचे असल्याचं दिसत आहेत. र

स्त्याच्या बाजुला ते दोघे एका दुचाकीजवळ उभे असल्याचं दिसत आहेत. तेथे ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. सुरुवातीला मुली मुलावर राग काढताना दिसत आहे. मुलगी रागाने बोलताना दिसत आहे. मुलीचं बोलणं झाल्यानंतर मुलगी तेथून निघून जाते. त्यानंतर मुलगा तिच्या पाठीमागे पळत जातो. तिला थांबवतो, नंतर तिला ओढत ओढत दुचाकीजवळ आणतो. नंतर तो मुलीला रागवताना दिसतोय. बोलतानाच तोच तिच्या कानशिलात एक लगावतो. त्यानंतर मुलगी त्याच्याशेजारी उभी राहते. तो मुलगा मोबाईलवर तिला काहीतरी दाखवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! आरसीबीच्या खेळाडूंचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT