Pune News  saam Tv
मुंबई/पुणे

Deenanath Mangeshkar Hospital: गर्भवती महिलेच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा; रुग्णालयाच्या समितीचा रिपोर्ट आला समोर

Tanisha Bhise death case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीने तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी अहवाल तयार केलाय. यात धक्कादायक बाब उघडकीस आलीय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहे. त्यानंतर रुग्णालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार डॉक्टरांची समिती नेमण्यात आली. या समितीचा अहवाल समोर आलाय, यात महिलेच्या मृत्यूबाबत धक्कादायक बाब समोर आलीय.

वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग, सचिन व्यवहारे या चार डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती. या डॉक्टरांच्या समितीने आपल्या अहवालात महिलेची संपूर्ण वैद्यकीय माहिती दिलीय. तनिषा भिसे या २०२२ पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या. तसेच २०२२ मध्ये त्यांची रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. २०२३ साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारधारणा आणि प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने स्पष्ट सांगितलं होतं.

आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी तीनवेळा करण आवश्यक असते. पण ही तपासणी त्यांनी या रुग्णालयात केली नव्हती. त्यानंतर त्या १५ मार्च रोजी इंदिरा आयव्हीएफ सेंटरचा रिपोर्ट घेऊन डॉक्टर सुशांत घैसास यांना भेटल्या. त्यावेळी डॉक्टर घैसास यांनी त्यांना जोखीम आणि धोकादायक प्रसृतीबद्दल माहिती दिली होती, अशी माहिती अहवालातून समोर आलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्या झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

शिवसेना आक्रमक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राडा

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर येऊन राडा केलाय. शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर पैसे फेकले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT