Gutkha Seized By Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यातून १ कोटी रुपायांचा गुटखा जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Gutkha Seized By Pune Police: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत १ कोटींपेक्षा जास्त किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. जवळपास ३०० पोती हा गुटखा आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये २५० ते ३०० गुटख्यांची पोती जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातील नऱ्हे परिसरातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची गुटखा जप्त केला आहे. एकाच ठिकाणी असलेल्या गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नऱ्हे परिसरातील गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. या छापेमारीतून पोलिसांनी २५० ते ३०० पोती गुटखा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे १ कोटी ३९ लाखांच्या आसपास आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने ४ जणांना अटक केली आहे.

पुण्यातून अहमदनगर, नाशिक, सातारा अशा अनेक ठिकाणी या गुटख्याची विक्री होत होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारखान्यांवरून गुटखा तयार करण्याचे सामग्री सुद्धा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये गुटखा विक्री आणि तयारी करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पुष्पेंद्र सिंग, सुनिल सिंग, मुकेश गेहलोत आणि चंदन सिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यासोबतच या आरोपींचा साथीदार निलेश ललवानी याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यामधून पोलिसांना आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT