pune crime police station saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पोलीस ठाण्यात पोलिसानेच स्वत:ला घेतलं पेटवून, कारण धक्कादायक

Pune Police News : पुण्यातल्या विश्रांतवाडी पोलीस स्थानकामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस शिपायाने रागाच्या भरात पोलीस स्थानकामध्ये पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले आहे.

Yash Shirke

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातल्या स्वारगेट डेपोमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गाडेच्या गावात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या घटनेच्या दरम्यान पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करुन घेत नाही म्हणून पुण्यातल्या एका पोलीस शिपायाने पोलीस स्थानकामध्ये स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्थानकामध्ये घेतली आहे. रागाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे विश्रांतवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विजय लक्ष्मण जाधव असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यांनी पोलीस स्थानकामध्ये स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकले आणि स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. विजय जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ आणि बहीण यांच्या विरोधात पुण्यातल्या विश्रांतवाडी पोलीस स्थानकामध्ये एकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे.

या महाराणीच्या दाखल गुन्ह्यात क्रॉस कम्प्लेट पोलीस घेत नसल्याने विजय जाधव चिडले होते. तेव्हा त्यांनी रागाच्या भरात भर पोलीस स्थानकामध्ये स्वत:ला पेटवून घेतले. खुद्द पोलीस स्थानकात तक्रार दाखल न केल्याने खुद्द पोलीस शिपायाने केलेल्या या कृत्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT