Pune Kondhwa Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : लग्नाचे वचन देऊन ३२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने गर्भपातही केला; पुण्यातील घटना

Pune Crime News : लग्नाचे वचन देऊन एका विवाहित तरुणाने ३२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही केला.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. लग्नाचे वचन देऊन एका विवाहित तरुणाने ३२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही केला. पुन्हा शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने तरुणीवर दबाव टाकला. तसेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रचित संतोष गोयल (वय ३४, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय तरुणी शहरातील कोंढवा परिसरातील राहते.

आरोपी रचित हा विवाहित आहे. मात्र, आपण अविवाहित असल्याचे भासवून त्याने नोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. या माध्यमातून पीडितेची आणि आरोपीची ओळख झाली. ओळखीनंतर दोघांचेही रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने गैरफायदा घेऊन पीडितेला लग्नाचे वचन दिले.

त्यानंतर तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (Crime) प्रस्थापित केले. यादरम्यान पीडिता गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने तिच्यावर दबाव आणून गर्भपात घडवून आणला. इतक्यावरच न थांबता आरोपीने पुन्हा पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. लग्नाची गळ घालूनही नकार मिळत असल्याने पीडितेने आरोपीसोबतचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा आरोपीने तुझे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे असून ते सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी पीडितेला दिली. दिवसेंदिवस आरोपीचे कृत्य वाढत असल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रचितविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT