Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुणे हादरलं! आईनेच मुलीच्या पोटात चाकू भोसकून केली हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना

Pune Crime : हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News: पुण्यात आईनेच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. वैष्णवी महेश वाडेर असं ४ वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटीतील ससाणे नगर येथे सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान आईने मुलीची हत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. आरोपी आई कल्पी वाडेर ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन आठवड्यापूर्वीच हे कुटुंबीय हडपसर येथे राहण्यास आले होते. आरोपी महिला बेकरीच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती, त्यामुळे घरमालक तिथे गेले. परंतु तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. (Pune Crime)

यानंतर शेजारच्यांनी तिला दरवाजा उघडण्यास सांगितले आणि घरमालकाने आत जाऊन पाहिले तेव्हा तिथे मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. पोलिस या हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT