Pune Fire News Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात अग्नितांडव! स्वारगेट परिसरात भीषण आग, तीन दुकाने जळून खाक

या भीषण आगीत आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र तिन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणेः देशभरात प्रजासत्ताक दिनाची लगबग सुरू असतानाच पुण्यात तीन दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात भंगार दुकान, रद्दी डेपो, आणि गादी दुकानांना ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात स्वारगेट परिसरात ही भीषण आगीची घटना घडली आहे. भंगार दुकान,रद्दी डेपो, आणि गादी दुकानांना ही भीषण आग लागली होती. याबद्दलची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ज्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश आले आहे.

दरम्यान, दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून ही आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या भीषण आगीत आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र तिन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. (Fire News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT