Manoj Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: 'आपलेच लोक आपल्या अंगावर घालण्याचा प्रयत्न...' जरांगे पाटलांचे सरकारवर गंभीर आरोप

Maratha Reservation Protest: पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये जरांगे पाटलांची सभा होत असून या विराट सभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, प्रतिनिधी

Maratha Reservation :

मराठा आरक्षणासाठी आक्रमक लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यात विविध भागात सभा होत आहेत. आरक्षणासाठी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिल्यानंतर जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहेत. आज (शुक्रवार, २० ऑक्टोंबर) पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये त्यांची सभा आहे. या विराट सभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

राजगुरूनगरमध्ये जरांगे पाटलांची विराट सभा...

मनोज जरांगे पाटील यांची पुण्याच्या (Pune) राजगुरुनगरमध्ये सभा आहे. या सभेला मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली असून तब्बल १०० एकरात ही सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल करताना आरक्षणाच्या मागणीवरुन इंचभरही मागे हटणार नसल्याचे सांगितले.

"अंतरवाली सराटीच्या सभेला गर्दी झाली. त्यानंतरच्या सभेला गर्दी होईल का? यावर शंका घेतली जात होती. राजगुरुनगरची सभा त्याला उत्तर आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मराठ्यांचे नशिब बळकट आहे. त्यामुळे मराठ्यांवर सरकार सोडून अन्याय करायला कोणीच तयार नाही," असा टोलाही जरांगे पाटलांनी यावेळी लगावला.

आत्महत्येंना सरकार जबाबदार..

या विराट सभेत बोलताना जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या मराठा बांधवांच्या आत्महत्यांना फक्त सरकारच जबाबदार आहे. सरकारने वेळेत आरक्षण दिले असते तर या आत्महत्या झाल्याच नसत्या.." असंही जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

"२४ तारखेपंर्यत कोणालाच काही बोलायचे नाही, असे सरकारने ठरवले आहे. मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता शांत राहायचे. २४ तारखेपर्यंत कोणालाच काही उत्तर द्यायचे नाही. वातावरण दूषित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असे आरोपही जरांगे पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT