ट्रक आणि कारची जोरदार धडक
अपघाताबाबत संशय असून चौकशी करण्याची मागणी केली जातेय.
अपघातात नायब तहसीलदाराचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर हायवा ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात दुर्घटनेत जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (52) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बनकरफाटा–जुन्नर मार्गावरील गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरजवळ हा अपघात झाला. दरम्यान हा अपघाताबाबत अनेकांना संशय येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल अधिकाऱ्यांची होंडा सिटी कार बनकरफाट्याहून जुन्नरकडे जात होती. यादरम्यान पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवा ट्रक गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर आला असताना कारची आणि हायवाची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कार फिरून उलट दिशेला गेली. या अपघातात निवडणूक नायब तहसीलदार अनंता गवारी गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
जुन्नरहून ओतूरकडे येणारा हायवा ट्रक (क्र. MH 14 KQ 0812) आणि ओतूरहून जुन्नरकडे निघालेली होंडा सिटी (क्र. MH 12 FF 6423) पांगरीमाथा येथे एकमेकांना जोरात धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला.
या अपघातात अनंता गवारी, विजय खारतोडे (वय ४८) आणि तुषार भीमराव कोरडे (वय ३५, सर्व रा. जुन्नर) जखमी झाले. गवारी यांना उपचारासाठी पुण्याकडे नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. विजय खारतोडे यांची प्रकृती गंभीर असून, तुषार कोरडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. ओतूर येथील निरामय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान संबंधित डंपर हा मांदारणे येथील ‘विघ्नहर्ता खडी केशर अँड पेवर्स’ कंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.