Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; अपघातात दोघांचाही मृत्यू

या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Accident News : पुण्यातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर दिवे येथे नातवाला शाळेतून घरी घेऊन जात असताना दोन मोटार सायकलची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका ६३ वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या नातवाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

गोकुळ धोंडीबा झेंडे( वय ६३) आणि पद्मनाभ झेंडे( वय ४) अशी जागेवर मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गोकुळ झेंडे हे आपल्या नातवाला शाळेतून आपल्या घरी घेऊन येत होते. रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने आजोबांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नातवाला गंभीर मार लागल्याने नातवाला जागेवरच मृत्यू झाला तर आजोबांना रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धडक दिलेल्या दुचाकीस्वारांकडे स्पोर्टस बाईक होती त्यामुळे तो वेगात होते. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट आजोबांच्या गाडीला धडक दिली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दुचाकीस्वार याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा भडका उडला. त्यांनी स्पोर्टस बाईक पेटवून दिली. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे झेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT