Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : आमचा भाई गेला, आता कोणालाही सोडणार नाही; हत्यारे भिरकावत पुण्यात गुंडांचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

Pune Crime News : आमचा भाई गेला, आता कोणालाही सोडणार नाही, असा आरडाओरड करत अज्ञात तरुणांनी पुण्यातील जय प्रकाशनगरमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

आमचा भाई गेला, आता कोणालाही सोडणार नाही, असा आरडाओरड करत अज्ञात तरुणांनी पुण्यातील जय प्रकाशनगरमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. हवेत हत्यारे भिरकावत या गुंडांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची देखील तोडफोड केली. इतकंच नाही, तर नागरिकांना देखील धमकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे.

याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) ४ अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. या चारही आरोपींचा शोध घेतला जातोय. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी सराईत गुन्हेगार सुधीर चंद्रकांत गवस (वय २५) याचा खून झाला होता.

परिसरात राहणाऱ्या आचार्य कुटुंबासोबत झालेल्या वादातून त्याचा खून (Crime News) झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. यावरून गवसचा भाऊ आणि त्याचे इतर साथीदार चिडून होते. याच रागातून आरोपी प्रकाशनगरमध्ये शिरले.

त्यांनी हातातील कोयते तसेच इतर हत्यारे हवेत भिरकावून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या वाहनांची देखील तोडफोड सुरू केली. तोडफोडीचा आवाज ऐकून स्थानिक घराबाहेर आले.

त्यांना देखील आरोपींनी धमकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिक चांगलेच धास्तावले असून पोलिसांनी गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : आमदारांसोबतच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे मुंबईतील शिवालयात दाखल

Fatty Liver Warning Signs: शरीरात ही ४ विचित्र लक्षणं दिसली तर समजा लिव्हरभोवती चरबी साठलीये!

हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बडीशेपच का देतात? कारण वाचून थक्क व्हाल

Indian Railways New Rule : रेल्वेचा नवा नियम लागू; विनातिकीट प्रवास केल्यास दुप्पट दंड, तुरुंगवासाचीही तरतूद

Operation Tiger: उबाठाचे ६ बंडखोर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शिंदेसेनेत करणार प्रवेश; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT