Pune Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire: पुण्यातील खराडी परिसरात सोफा कारखान्याला भीषण आग, परिसरात पसरले धुराचे लोट

Pune Kharadi Sofa Factory Fire: खराडी परिसरातील चंदनगर जकातनाका येथील वाघेश्वर पार्किंगजवळ असणाऱ्या सोफा बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर रस्त्यावरील खराडी परिसरात ही घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरामध्ये सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामधील खराडी परिसरातील चंदनगर जकातनाका येथील वाघेश्वर पार्किंगजवळ असणाऱ्या सोफा बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कारखान्यात मोठ्याप्रमाणात लाकूड, कापड,स्पंज असल्यामुळे आगने रौद्ररूप धारण केले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कारखान्याला लागलेल्या आगीमुळे खराडी परिसरामध्ये सगळीकडे घुराचे लोट परसरले आहे. कारखाना ज्या ठिकाणी आहे तो परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळे येत आहेत. नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. कारखान्याला आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT