Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : 'ओ शेठ' अन् 'साहेब' जोरदार भिडले; फुकट सूपच्या ऑफरवरून पुण्यात तुफान राडा

Pune Crime: पुण्यात सध्या कोयता गँगचा विषय चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Hotel Beaten Case : पुणे आणि पुणेकरांच्या सगळ्याच गोष्टींची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असते. पुण्यात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. पुण्यात सध्या कोयता गँगचा विषय चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दोन हॉटेल मालकांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांना फुकट सूपच्या ऑफरवरून एका हॉटेल मालकाने चक्क त्या हॉटेल मालकाला हॉटेलचालकाच्या (Hotel) डोक्यात हत्याराने वार केल्याची धककदायक घटना घडली आहे. ही घटना 06 फेब्रुवारी राेजी मेवाड पावभाजी सेंटरसमाेर चाैपाटी खडकी येथे घडली.

मुलायम रामकृपाल पाल असे जखमी झालेल्या हॉटेलचालकाचे नाव असून त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. व्यावसायिक स्पर्धेतून हे प्रकरण झाल्याचे कळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाल यांचे खडकी बाजार परिसरात ‘ओ शेठ’ नावाचे हॉटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. या योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. याचा परिणाम शेजारी असणाऱ्या हॉटेल्सवर होत असल्याचे दिसून आले.

आरोपी भालेराव आणि गजरे याचे त्याच परिसरात साहेब नावाचे खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे. पाल यांच्याकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे दोघांच्या ही मनात पाल यांच्या विषयी राग होता. या वादातून आरोपींनी पाल यांला मारहाण करून डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले ज्यात पाल हे गंभीर जखमी झाले.

तक्रारदार हॉटेल चालकावर रुग्णालयात (Hospital) सध्या उपचार सुरू असून खडकी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT