Elon Musk Saam Tv
मुंबई/पुणे

पुणेकर जगात भारी! पठ्ठ्याने थेट अमेरिकेत जाऊन घेतली एलन मस्क यांची घेतली भेट

पुण्यातील २३ वर्षीय प्रनय पाटोळे याने नुकतीच टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांची अमेरिकेत जाऊन भेट घेतली.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: पुण्यातील (Pune) २३ वर्षीय प्रनय पाटोळे याने नुकतीच टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांची अमेरिकेत जाऊन भेट घेतली. प्रनयने टेस्लाच्या ऑफिसमध्ये भेट घेतली. या भेटीची फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रनय हा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो.

या भेटीचा फोटो ट्विट (Tweet) करत प्रनयने माहिती दिली आहे. इलॉन मस्क यांना प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला. गीगाफॅक्टरी टेक्सास येथे एलन मस्क यांच्यासोबत झालेली भेट खूप छान होती. इतकी नम्र आणि साधी व्यक्ती मी कधीच पाहिली नाही. तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात, असे प्रणयने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पुणेकर प्रनय आणि एलन मस्क २०१८ पासून सोशल मीडियावर मित्र आहेत. ते सोशल मीडियावर बऱ्याच विषयांवर बोलत असतात. प्रनय च्या ट्विटला एलन मस्क रिप्लाय देत असतात.

प्रनय आणि एलन मस्क यांची २०१८ पासून सोशल मीडियावर मैत्री आहे. प्रणयने मस्क यांची कंपनी टेस्लाच्या ईलेक्ट्रीक कारमधील एक समस्या शोधली होती. ऑटोमेटिक विंडस्क्रीन वायपर पावसामध्ये नीट काम करत नाही हे त्याने मस्क यांना ट्विट करून सांगितले होते. ही समस्या शोधल्याबद्दल मस्क यांनी त्याचे आभारही मानले होते. तेव्हापासून या दोघांची मैत्री आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT