Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुणे शहरात गुन्हेगारांचा उच्छाद, मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १५ वाहने फोडली; दोघांना तातडीने अटक

Pune Crime News : आरोपींनी मद्यपान करुन जनता वसाहतीत मध्यरात्री ६ रिक्षा, १ कार, ४ दुचाकी आणि १ ओमिनी कारची बांबूने तसेच दगडाने तोडफोड केली.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे कोयता गँगने शहरात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे मद्यपींच्या टोळक्यांकडून देखील दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. असाच काहीचा प्रकार जनता नवसाहत गल्ली नंबर ४७ मध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला आहे. दारुच्या नशेत तीन तरुणांच्या टोळक्याने तब्बल १० ते १५ वाहनांची तोडफोड केली आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी तातडीने या गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे. जय जगताप आणि शंतनू जगताप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर आरोपी पियुष गायकवाड हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मद्यपान करुन जनता वसाहतीत मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला. दारुच्या नशेत त्यांनी ६ रिक्षा, १ कार, ४ दुचाकी आणि १ ओमिनी कारची बांबूने तसेच दगडाने तोडफोड केली.

यावेळी आरोपींनी नागरिकांना धमकावण्याचा देखील प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी गुन्हा दाखल करत शंतनू जगताप आणि पियूष गायकवाड याला बेड्या ठोकल्या. तर एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना

पुण्यातील कल्याणी परिसरातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. सुसाट वेगात असलेल्या आलिशान कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यातील एका दुचाकीवरील तरुणांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, दुसऱ्या दुचाकीवरील तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डिंगसमोर गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर कारचालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी आयुष प्रदीप तयाल याला बेड्या ठोकल्या आहेत. अपघातावेळी आरोपीने मद्यपान केले होते, अशी प्राथामिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ७ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी ठाकरेंची मोठी खेळी, पवारांना वगळून थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा

Bribe Case: मंत्रालय लाच प्रकरण; नरहरी झिरवळ राजीनामा देणार? मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलणं दुर्देवी'; अमोल मिटकरी असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT