Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या तरुणाची आत्महत्या; घरमालकाकडून धक्कादायक माहिती उघड

स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून केली आत्महत्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे - लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची केळ्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक धायरी परिसरात घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महेश तवंडे असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. नैराश्यातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता पोलिसांकडून (Police) व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

महेश हा मूळचा कोल्हापूर (Kolhapur) येथील असून तो पुण्यामध्ये (Pune) ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करत होता. तो गेल्या वर्षभरापासून त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. गणपती उत्सवापासून मैत्रीण बाहेरगावी गेली होती. दरम्यान त्याने शुक्रवारी स्वतःच्याच हाताने गळ्यावर वार केले. घरमालकाला ओरडण्याचा आवाज आला होता परंतु नेहमीच या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज येत असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. रात्री घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याला माहिती दिली.

माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आतून बंद असलेला फ्लॅटचा दरवाजा तोडला असता महेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून सिंहगड रस्ता पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT