Shivsena Dasara Melava Saam TV
मुंबई/पुणे

शिंदे गटाच्या बसमध्ये बिहारी लोकं, कोठे अन् कशासाठी निघालोय सांगताही येईना; पाहा Video

आपल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

Jagdish Patil

प्राची कुलकर्णी -

मुंबई: संपुर्ण राज्यचे लक्ष लागून राहिलेला शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळाव्याला (Dasara Melava) काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. आजचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी प्रतिष्ठेचा बनवला असून आपल्याचं मेळाव्याला जास्त शिवसैनिक (Shivsainik) उपस्थित राहणार असल्याचं दोन्ही गटांतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

शिवाय आपल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यासाठीच राज्यभरातून शिवसैनिकांना मुंबईत येण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

मात्र, अनेक कार्यकर्त्यांना कार्यक्रम काय आहे, आपण कोठे आणि कशासाठी निघालो आहोत यातली काहीही माहिती नसल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहेत. अशातच आता पुण्यातून (Pune) चक्क बिहारी लोक शिंदे गटाच्या मेळाव्याला निघाल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मुंबईला मेळाव्यासाठी यायला काही बस ठरवल्या आहेत. या बसमध्ये चक्क बिहारच्या लोकांना बसवण्यात आलं आहे. शिवाय आपण कुठे चालला आहात? असं विचारल्यावरती कोण आपण 'बॉम्बे घुमने जा रहे है', तर कोणी आम्हाला गाडीत बसायला लावलं असल्याचं सांगत आहेत.

मात्र, त्यांना मेळाव्याबद्दल काहीही माहित नसल्याचं समोर आलं आहे. शिवाय गाडीतील केवळ एकाने आपण एकनाथ शिंदेंच्या भाषणासाठी निघालो असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे केवळ गर्दी करण्यासाठी ही लोकं जमवली जात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

इराणवर अणुहल्ला होणार का? ट्रम्प यांच्या धमकीनंतर मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT