Baba Siddique Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड, तीन महिन्यांपासून सुरू होता हत्येचा कट

Baba Siddique Killed Case Update: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा कट पुण्यात रचण्यात आला होता. त्यांच्या हत्येची तयारी ही गेल्या ३ महिन्यांपासून सुरू होती.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा कट पुण्यात रचण्यात आला होता. त्यांच्या हत्येची तयारी ही गेल्या ३ महिन्यांपासून सुरू होती. अखेर आरोपींनी दसऱ्याचा दिवस गाठला आणि बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे येथील त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट गेल्या तीन महिन्यांपासून रचला जात होता. आरोपी अनेकवेळा बाबा सिद्दीकी यांच्या घरी देखील जाऊन आले होते. सिद्दीकी यांच्या हत्येचे संपूर्ण प्लॅनिंग पुण्यातच झाले होते. चौथा आरोपी हरीश हा मध्यस्थ म्हणून काम करत होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हा सध्या फरार आहे या दोघांनी अटक केलेल्या शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना २ लाख रुपये दिले होते. चौथा आरोपी हरीश याच्यामार्फत शूटर्सला पैसे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रविण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे दोघे सोशल मीडियाद्वारे काही वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले गेले. बिश्नोई गँगला शस्त्र पुरवल्या प्रकरणात शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. शुभम लोणकर त्यांच्या मुळ गावी राहत होता. तर त्याचा भाऊ प्रविण लोणकर पुण्यातील वारजे भागात राहतो. त्याने डेअरी आणि किराणा विक्रीचे दुकान सुरू केले होते.

शुभम लोणकरच्याच्या सांगण्यावरुनच बाबा सिद्दीकींच्या हत्येत सहभागी असलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पुण्यात येऊन राहिले‌. प्रविण लोणकरने या दोघांना एका भंगार विक्रेत्याकडे काम मिळवून दिले. ते पुण्यात राहत होते पण अनेकदा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी ते मुंबईत येत होते. गेल्या ३ महिन्यांपासून ते सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचत होते अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT