Pune FTII News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News | पुण्यात FTII च्या २५ वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, लेक्चरला न आल्यानं खोलीत जाऊन बघितलं तर....

पुण्यातील एफटीआयआयमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

साम ब्युरो

Pune News | पुणे: पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (FTII) मधील विद्यार्थिनीनं गळफास घेऊ आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया अर्थात (FTII) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. तिनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. कामाक्षी बोहरा (वय २५) असे या तरुणीचे नाव आहे.

कामाक्षी ही मूळची झारखंड येथील रहिवासी होती. पुण्यातील एफटीआयआय या संस्थेत ती शिक्षण घेत होती. आज, गुरुवारी ती सकाळी लेक्चरला आली नाही. त्यामुळे शिक्षकांनी ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितलं. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. खोलीमध्ये ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

वैफल्यग्रस्त असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्याच महिन्यात एफटीआयआयमध्ये फोटोग्राफीचं शिक्षण घेणाऱ्या ३२ वर्षीय तरुणानंही आत्महत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT