पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने केला महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने केला महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे : पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा गाव या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. (pune crime marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. आरोपी समीर गायकवाड याचे भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. सुमारे दीड वर्षापूर्वी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या एकट्या घरात होत्या, त्यावेळेस आरोपी घरी आला. किचनमध्ये त्याने फिर्यादी यांच्या कमरेला पकडले आणि जबरदस्ती करू लागला. तेव्हा त्यांनी विरोध केल्यावर मुलांना व पतीस मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार (Sexual Assault) केला. या प्रकारानंतर फिर्यादी एकदम घाबरुन गेल्या, त्यानंतरही त्याने फिर्यादी यांचे तोंड पकडले व खाली पाडले. त्यांच्यावर जबरदस्ती करु लागला या कृत्याला त्यांनी विरोध केल्यावर तुझ्या नवर्‍याला व मुलांना जीवे मारण्याची, तुमचे परिवार संपवून टाकीन, अशी धमकी देऊ लागला.

हे देखील पहा-

या धमकीमुळे त्यांनी कोणाला हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर (ता. 17 डिसेंबर 2021) रोजी दुपारी 2 वाजता समीर गायकवाड याने फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला आणि त्याने त्यांना मारण्याची धमकी देत तेथून देऊन निघून गेला. या प्रकारानंतर त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

दरम्यान, या विरोधात राष्ट्रवादी चे नगरसेवक सुनील गायकवाड यांनीही संबंधित महिला आणि तिच्या पती विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन मुंढवा पोलिसांनी या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT