pune nasrapur case : Saam tv
मुंबई/पुणे

नसरापुरात 'त्या' दिवशी काय घडलं? नराधमाने चिमुकलीला काय खायला दिलं? पोलीस तपास धक्कादायक माहिती उघड

pune nasrapur case : नसरापुरातील पीडित चिमुकलीवर आरोपी भीमराव कांबळेने भयंकर कृत्य केलं. आरोपीच्या पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड होत आहे.

Vishal Gangurde

नसरापूर प्रकरणाचा सर्वत्र निषेध

नसरापूर प्रकरणातील आरोपीची कसून चौकशी

पोलीस चौकशीत आरोपीने चिमुकलीवर गोठ्यात अत्याचार केल्याचे उघड

सागर आव्हाड, साम टीव्ही

नसरापूर प्रकरणावरून समाजातील सर्वच स्तरात उद्रेक पाहायला मिळत आहे. 65 वर्षीय आरोपीने चिमुकलीची अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलन-रास्ता रोको केले जात आहेत. पुण्यातील विविध ठिकाणी बंद देखील पुकारण्यात येत आहेत. या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपीच्या चौकशीनंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे.

नसरापूर प्रकरणातील आरोपीचे काळे कारनामे उघडीस येऊ लागले आहेत. नराधमाने याआधी दोन गंभीर गुन्हे केले आहेत. दोन गंभीर गुन्ह्यानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपीने पुन्हा विकृत कृत्य केलं. पीडितेची हत्या करणारा नराधाम सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. लहान मुलींवर वाईट नजर असलेल्या नराधम भीमराव कांबळेने पीडितेला आवाज दिला. तिच्या मागे हळूहळू चालू लागला.

नराधमाने चिमुकलीला काय खायला दिलं?

नराधम भीमराव कांबळेने चिमुकलीला गाठी शेव खाण्यास दिली. त्यानंतर गोठ्यात नुकतेच जन्माला आलेले गाईचे वासरू दाखवतो म्हणून नराधाने चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून चिमुकीलाला ठार मारले. पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची सोशल मीडियावर पोस्ट

पुण्यातील नसरापूर प्रकरणावरून केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,' नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि घृणास्पद घटनेमुळे मन खिन्न आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे. मी पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे'.

'या प्रकरणातील गुन्ह्याला केवळ फाशी हीच शिक्षा व्हावी. या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी मी कालपासून मुख्यमंत्री, पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात आहे. तसेच पीडित कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्याही सतत संपर्कात आहे. घडलेला प्रकार निश्चितच चीड आणणारा आहे. समाजातील अशा विकृती वेळीच ठेचणे गरजेचे आहे. नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी, आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. मी स्वतः दोन मुलींचा बाप असून आहे. पीडित कुटुंबियांचं दुःख ते माझंही आहे, याच भावनेतून हे प्रकरण तडीस नेण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT