nasrapur case update Saam tv
मुंबई/पुणे

नसरापूर प्रकरणावरून राजकारण साधू नका; पीडित चिमुकलीच्या बापाचा संताप, आंदोलकांनी टोल नाक्यावर टायर जाळले

nasrapur case update : नसरापूर प्रकरणावरून पीडीत मुलीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात आंदोलकांनी टोल नाक्यावर टायर जाळले.

Vishal Gangurde

नसरापूर प्रकरणावरून नागरिकांमध्ये संतापाचा आगडोंब

नागरिकांकडून भोर, राजगड बंदची हाक

पीडित चिमुकलीच्या बापाकडूनही संताप व्यक्त

पुणे जिल्ह्यात नसरापूर प्रकरणावरून नागरिकांमध्ये संतापाचा आगडोंब उसळला आहे. पीडित चिमुकलीवरील अत्याचाराने भोर, राजगड तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेच्या विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहेत. शरद पवार गट, ग्रामस्थ, विरोधी पक्ष, आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेच्या विरोधात टोल नाक्यावर आंदोलकांनी टायर पेटवले आहेत. तर या प्रकरणावरून स्वत:चं राजकारण साधू नका, अशा शब्दात पीडित मुलीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला.

नसरापूर प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. नराधमाच्या कृत्याच्या विरोधात सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर सामाजिक संघटनांनी आंदोलन केलं. आंदोलन करताना पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. याच वेळी आंदोलकांकडून टायर पेटवण्यात आले. परंतु पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणानंतर सर्व राजकीय नेते पीडित मुलीच्या गावी भेट देत आहेत. पीडित कुटुंबाला भेट देत आहेत. पीडित मुलीच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यावर आम्हाला भेटा, अशी विनंती पीडित मुलीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांना केली आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, ' मी अस्थी विसर्जनासाठी देहूमध्ये आलो. त्याचवेळी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा फोन आला. अनेक राजकारणी सांत्वन भेटण्यासाठी येत आहेत. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे की, जोपर्यंत नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणीही भेटण्यास किंवा सांत्वन करण्यास येऊ नये. नराधमाला फाशी झाल्यावर आम्हाला ज्यांना भेटायचं आहे, त्यांना आम्ही भेटू '.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा 'ॲक्शन मोड'वर! आता राज्यातील रुग्णालयांना दिला थेट कारवाईचा इशारा; काय आहे कारण?

Gautami Patil : "हिल हिल पोरी हिला तुझ्या प्रेमात झालो फिदा..."; गौतमी पाटीलचा नखरा पाहून नेटकरी घायाळ, 'ते' Photos आले समोर

Bleeding Gums: दात घासताना हिरड्यांतून रक्त येतंय? दुर्लक्ष करू नका; असू शकते गंभीर समस्येची सुरुवात

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

SCROLL FOR NEXT