Pune Nagar Highway Accident Saam TV
मुंबई/पुणे

Pune : पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी प्रवासी बस रांजणगावजवळ उलटली; चौघे गंभीर

पुणे नगर महामार्गावर रांजणगावजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे नगर महामार्गावर (Pune Nagar Highway) रांजणगावजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी प्रवासी बस पलटी झाली आहे. त्यामुळे ऐन सनासुदीला गावाकडे जाणाऱ्या नागरिकांवर दुर्दैवी वेळ आली आहे.

या बसमधील 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती समोर येत आहे. तर जखमी प्रवाशांना (Passenger Bus) रांजणगाव पोलीसांच्या (Ranjangaon) मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी प्रवासी बस रांजणगावजवळ आली असता पहाटेच्या सुमारास ही बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. त्यामुळे ऐन सनासुदीला जाणाऱ्या प्रवाशांवर दुर्घटना ओढावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

SCROLL FOR NEXT