Pune news Saam
मुंबई/पुणे

Pune: पुणे महापालिकेचा रिचार्ज संपला? ११०० अधिकाऱ्यांच्या फोनचे आउटगोइंग बंद! कारण काय?

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेतील तब्बल ११०० अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनवरील आउटगोइंग कॉल आणि इंटरनेट सेवा सोमवारी दुपारी अचानक बंद करण्यात आली.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे महापालिकेतील तब्बल ११०० अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनवरील आउटगोइंग कॉल सेवा सोमवारी दुपारी अचानक बंद झाली. ही सेवा बंद होण्यामागे मोबाईल बिल न भरल्याचे कारण समोर आले आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांचे तब्बल ११०० मोबाईलचे आउटगोइंग बंद झाले असून, याची माहिती महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून संबंधित क्रमांकांवर मोबाईल कंपनीकडून ‘बिल न भरल्यास सेवा बंद होईल’ अशा स्वरूपाचे मेसेज येत होते. मात्र, सोमवारी दुपारी १ वाजेनंतर या सर्व क्रमांकांची आउटगोइंग कॉल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

घटनेनंतर संबंधित बाब महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

SCROLL FOR NEXT