Traffic congestion on Mumbai-Pune Expressway will break out MSRDC took big decision ssd92 Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Pune ExPressway: सलग सुट्ट्यांमुळे लगबग! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान वाहतुक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Borghat Traffic Update: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

दिलीप कांबळे

Mumbai- Pune EXpressway Traffic:

गणपती उत्सवाची सांगता झाल्याने शहराकडे आणि सलग सुट्ट्यांमुळे गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणपती उत्सवाचा सण आटोपून गावी आलेल्या चाकरमान्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. तसेच सलग सुट्ट्यांमुळे शहरातील चाकरमानी गावाकडे येत आहेत.

त्यामुळे महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव घाटात ट्राफिक जाम झाले आहे. तसेच लोणावळ घाटातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत,

सलग सुट्ट्यांमुळे लगबग...

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सलग सुट्ट्या सुरू आहेत. गणेशोत्सवानंतर एक दिवस सुट्टी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शनिवार, रविवार आणि सोमवार (२ ऑक्टोंबर) महात्मा गांधींजींची जयंती असल्यामुळे सुट्टी असणार आहे. त्यामुळेच मुंबईकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले असून त्यामुळेच महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT