Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; खोलीत बंद केलं अन्..

Pune Vishrantwadi Girl Physically Abused : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • ओळखीच्या तरुणाकडून विश्वासघात

  • कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत

  • परिसरात भीती आणि सुरक्षेच्या प्रश्नांची चर्चा

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (pune crime) मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटना ४ डिसेंबर रोजी घडली असून पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्या दोघांची ओळख एका बस स्टॉप वर झाली होती. ४ डिसेंबर रोजी आरोपीने तिला शाळेत सोडतो असे सांगितले. आरोपी तरुण ओळखीचा असल्याने पीडितेने डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या गाडीवर बसली.

मात्र तरुणाने मुलीचा विश्वासघात केला. मुलीला गाडीवर बसून एका निर्जनस्थळी नेले. या तरुणाने पीडित मुलीला एका खोलीत नेले आणि जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. अत्याचारानंतर पीडित मुलीने कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

IPL 2026: RCBlचं प्लेऑफमधील तिकीट कन्फर्म; पंजाबच्या पराभवानंतर २ संघांची 'चांदी', कसे असणार स्पर्धेचं समीकरण?

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

ATM मशिन गंडलं, नागरिकांची लॉटरी, 400 रुपयांची मागणी, मिळाले 2 हजार

SCROLL FOR NEXT