Pune Metro Saam TV
मुंबई/पुणे

Pune Metro Fare and Timetable : पुणे मेट्रो प्रवासासाठी भाडे किती असणार? वेळाही ठरल्या, विद्यार्थ्यांसाठी विशेष सूट

Pune Metro Inauguration : फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे.

प्रविण वाकचौरे

Pune Metro News :

पुण्यातील मेट्रो -२ चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे. पुणे मेट्रोची पीसीएमसी ते फुगेवाडी व वनाझ ते गरवारे या मार्गिकेचं उदघाटन गेल्या वर्षी झालं. आता दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते झालं आहे.

नव्या मेट्रो मार्गामुळे पीसीएमसी ते सिव्हिलकोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे पुणेकरांना शक्य होणार आहे. मेट्रोचे किमान भाडे १० रुपये असणार आहे. तर जास्तीत जास्त भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ प्रवासासाठी ३५ रुपये भाडे लागेल. तर पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल. (Pune News)

विद्यार्थ्यांना भाड्यात सूट

पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३० टक्के सवलत असेल. तर मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे.

मेट्रोची वेळ कशी असेल?

पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट

  • सकाळी ७ ते ८ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन

  • सकाळी ८ ते ११ दरम्यान- दर १० मिनिटांनी एक ट्रेन

  • सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन

  • दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान - दर १० मिनिटांनी एक ट्रेन

  • रात्री ८ ते १० दरम्याना - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन

वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक

  • सकाळी ७ ते ८ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन

  • सकाळी ८ ते ११ दरम्यान- दर १० मिनिटांनी एक ट्रेन

  • सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन

  • दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान - दर १० मिनिटांनी एक ट्रेन

  • रात्री ८ ते १० दरम्याना - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT