pune news saam tv
मुंबई/पुणे

Pune Metro : पुण्यात महामेट्रोकडून दुमजली उड्डाणपूल बांधला जाणार, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Pune Metro News : पुण्यामध्ये वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम सुरु होणार आहे. या मेट्रो मार्गासोबतच महामेट्रोकडून दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या उड्डाणपूलाचा आराखडा मेट्रो प्रशासनाने महापालिकेसमोर सादर केला आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात महामेट्रोकडून दुमजली उड्डाणपुलाची तयारी सुरु झाली आहे. मेट्रो प्रशासन वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मेट्रो मार्गासोबत पौड रस्त्यावर कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत दुमजली उड्डाणपूल देखील उभारला जाणार आहे.

पुणे महामेट्रोने दुमजली उड्डाणपुलाचा आराखडा पुणे महापालिकेसमोर सादर केला आहे. या पुलासाठी महामेट्रोकडून ८५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे. या उड्डाणपुलामुळे पौड रस्त्यावरुन कोथरुड डेपो परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून पौड रस्ता ओळखला जातो. पौड आणि पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणारा हा रस्ता शहरातील सर्वात जवळचा रस्ता आहे. त्यामुळे तेथे सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याशिवाय लोहिया आयटी पार्क ते कचरा डेपोपर्यंत तीन सिग्नल असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने तब्बल दीड किमी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.

वाहतूक कोंडीची ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन होते. आता आता महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौका पर्यंत मेट्रोचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नळस्टाॅप येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या धर्तीवर कोथरूड डेपोच्या समोरही उड्डाणपूल उभारला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT