Maval Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident: हृदयद्रावक! भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; भीषण अपघातात बाप- लेकीचा करुण अंत

Maval Talegaon Accident: दुर्देवी अपघातात सुनील वाघमारे आणि मुलगी आर्या सुनील वाघमारे या बाप-लेकीचा दुर्देवी अंत झाला.

दिलीप कांबळे

Maval Accident:

मावळमधून एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. मावळच्या तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप- लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील वाघमारे,मुलगी आर्या सुनील वाघमारे, तर मुलगा गणेश आणि पत्नी परवीन वाघमारे हे चार जण तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवरुन घरी जात होते. यावेळी नानोली फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरील सर्वजण खाली पडल्यावर कंटेनर न थांबता त्यांच्या अंगावरून निघून गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या दुर्देवी अपघातात सुनील वाघमारे आणि मुलगी आर्या सुनील वाघमारे या बाप-लेकीचा दुर्देवी अंत झाला. तर दुसरी मुलगी आणि आई गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कंटेनरचालक तसाच पुढे निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Tiger Attack : चंद्रपुरात वाघ लोकांच्या जीवावर का उठलेत? कारण आलं समोर

Mango Coconut Barfi: उन्हाळ्यात बनवा मऊ स्वादिष्ट आंबा नारळ वडी; वाचा सोपी रेसिपी

नीट पेपरफुटीचा आणखी एक बळी; पेपर फुटीच्या तणावातून लातूरमधील विद्यार्थिनी संपवलं जीवन

Maharashtra News Live Update: अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पलटी; चार गोवंशांचा मृत्यू

No salt diet: सलग 15 दिवस मीठ खाल्लं नाही तर काय होईल, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT