Breaking: बारामती कोर्टाने मनोहर भोसलेला सुनावली न्यायालयीन कोठडी Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: बारामती कोर्टाने मनोहर भोसलेला सुनावली न्यायालयीन कोठडी

बारामती कोर्टाने आज मनोहर भोसलेला (Manohar Bhosale) बारामती न्यायालयाने (Baramati Court) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मंगेश कचरे

बारामती कोर्टाने आज मनोहर भोसलेला (Manohar Bhosale) बारामती न्यायालयाने (Baramati Court) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोहर भोसलेला जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बारामतीतील रहिवासी शशिकांत खरात यांच्या वडिलांना अघोरी उपचार केल्याप्रकरणी आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 8 तारखेला मनोहर भोसले आणि त्याच्या अन्य 2 साथीदारांवर बारामती पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला होता. 10 तारखेला मनोहर भोसलेला बारामती पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला सुरवातीला 5 दिवस आणि नंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज मनोहर भोसलेला एन व्ही रणवीर यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोहर भोसलेचा एक साथीदार ओंकार शिंदे हा बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप त्यांचा एक साथीदार फरार आहे.

दरम्यान आज पोलिसांनी स्वतःहून मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी मागितली होती. पण मनोहर भोसलेच्या वकिलांनी पोलीस कोठडी मागितली होती. परंतु पोलिसांनी न्यायालयीन कोठडी का मागितली असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे पोलीस संशयास्पद वागत आहेत. म्हणून पोलिसांविरोधात मनोहर भोसले यांचे वकील उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती ऍड. रुपाली ठोंबरे यांनी सांगितले. सध्या बारामतीत करमाळा पोलिसांचे पथक दाखल झालेआहे. सध्या मनोहर भोसलेच्या जामीनाची प्रक्रिया सुरू आहे. मनोहर भोसलेला जामीन मिळताच करमाळा पोलीस मनोहर भोसलेला ताब्यात घेतली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT