puneAccident Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : चाललंय काय? पुण्यात पुन्हा भीषण अपघात; मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाने पादचाऱ्याला चिरडले

Pune Accident News : पुण्यात अपघातांचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.पुण्यात मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना घडली. या घटनेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यात पुन्हा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील लोहगाव भागात मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना घडली. या भीषण घटनेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला अटक केली आहे. पुण्यात पुन्हा भीषण अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना घडली आहे. मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाने धडक दिल्यामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोहगाव भागात फॉरेस्ट पार्कजवळ ही घटना घडली आहे. सुरेंद्रसिंह कुम्पावत असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी रुग्णावाहिका चालक संजय चन्नापा मुल्लोळी याला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

सुरेंद्रसिंह हे शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास सुरेंद्रसिंह लोहगाव परिसरात रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुरेंद्रसिंह यांना प्राण्यांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक दिली. या रुग्णवाहिकेच्या धडकेत सुरेंद्रसिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पोलिस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार यांच्या नेतृत्वात घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर चालक मुल्लोळी याने मद्य सेवन केल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आलं आहे.

या भीषण अपघातानंतर मध्यरात्री अटक केल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी बोपोडीतही भरधाव दुचाकीने धडक दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघातातील दुचाकीस्वारानेही मद्य सेवन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT