Pune Police investigation uncovers an alleged murder conspiracy behind Ketan Agrawal's death at Lohagad Fort. Saam TV Marathi
मुंबई/पुणे

भर उन्हात गरम कपडे, लपून-छपून डोळ्यांनी इशारे; केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी आरोपीने काय काय केलं? धक्कादायक माहिती आली समोर

Ketan Agrawal murder case latest update : लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासा. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने रचलेल्या कथित खुनाच्या कटाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला.

Akshay Badve

Pune Ketan Agrawal Lohagad Fort murder case : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ जून रोजी घडली होती. सुरुवातीला हा एक अपघात वाटत असतानाच, पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात मन सुन्न करणारा खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा खून असल्याचं निष्पन्न झालं.

प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'हा अपघात नसून खून आहे' या निष्कर्षापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं; मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, लोणावळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या अत्यंत बारकाईने केलेल्या तपासातून हे सत्य स्पष्ट झालं.

अग्रवाल मृत्यू प्रकरणात लोणावळा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या घटनेचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली.

भर उन्हात हुडी, तोंडाला मास्क अन् कानाला हेडफोन

पुणे ग्रामीण पोलीस या घटनेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्यांची भावी पत्नी सिया गोयल यांचा पाठलाग करणारा एक तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला, ज्याने 'हुडी' घातलेली होती. जून महिन्यातील सुमारे ३३ अंश सेल्सिअस तापमान असतानाही संबंधित व्यक्तीने हुडी परिधान केली होती. इतकंच काय, तर तोंडाला मास्क आणि कानात मोठे हेडफोन लावून चालणारा हा तरुण अशा परिस्थितीत तिथे काय करत होता, असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी १८ जून रोजीच्या तापमानाची नोंद तपासली असता, ते ३३ अंश सेल्सिअस असल्याचं आढळलं. इतक्या उष्ण वातावरणात एखादी व्यक्ती हुडी का घालेल? या प्रश्नाने आणि त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तपासादरम्यान काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने आम्ही अधिक खोलात जाऊन चौकशी सुरू केली. किल्ल्याच्या तिकीट काउंटर जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, केतन आणि सिया एकत्र चालताना दिसले.”

सिया आणि चेतनचा 'सांकेतिक भाषेतून' (Sign Language) संवाद

संबंधित संशयित व्यक्तीने शॉर्ट्स आणि हुडी घातली होती. हुडीचा पुढचा भाग इतका खाली ओढलेला होता की त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता, तसेच त्याने हुडीवरूनच हेडफोन घातलेले होते. एका फुटेजमध्ये दिसले की, सियाने लोहगडावर असताना अचानक मागे वळून पाहिले आणि त्याच वेळी हुडी घातलेली व्यक्ती अचानक खाली बसली. एका ठिकाणी सिया आणि केतन थांबले असताना, ती व्यक्तीही काही अंतरावर येऊन थांबली. तिथून केतनची नजर चुकवून सिया संबंधित तरुणाला डोळ्यांनी इशारे तसेच हातवारे करत होती. यानंतर तपास अधिक व्यापक करण्यात आला आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तसेच डिजिटल कम्युनिकेशन डेटासह सर्व तांत्रिक पुरावे तपासण्यात आले.

सियाच्या कॉल रेकॉर्डची छाननी करताना, तिचे एका व्यक्तीसोबत मोठ्या प्रमाणावर संभाषण होत असल्याचे आढळले. पुढील तपासात ती व्यक्ती तिचा प्रियकर चेतन चौधरी असल्याचे निष्पन्न झाले.

सिया आणि चेतनमध्ये ६ महिन्यांत २००० फोन कॉल्स

सिया आणि चेतन यांची गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. तेव्हापासून त्यांच्यातील मैत्री वाढली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये गेल्या ६ महिन्यांत तब्बल २००० फोन कॉल्स झाले असल्याचं तपासातून समोर आलं आहे. त्यातील अनेक संभाषणे तासनतास चालत असत. तांत्रिक विश्लेषणातून दोघांमधील घनिष्ठ संबंध स्पष्ट झाले आणि हा पूर्वनियोजित कट असल्याचे संकेत मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास त्या दृष्टीने गतिमान केला.

चेतनचे फोटो आणि सोशल मीडिया प्रोफाइल तपासण्यात आले. त्यांची तुलना किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधील हुडी घातलेल्या व्यक्तीशी केली गेली. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गोळा केलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चेतनचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव

Maharashtra News Live Update: हिंगोलीत अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात

Bullet Train Recruitment 2026: नोकरीची मोठी संधी! बुलेट ट्रेनमध्ये 224 जागांची भरती, पात्रता आणि शेवटची तारीख जाणून घ्या

पावसाळ्यात आजारी पडण्याची भीती नाही! निरोगी राहण्यासाठी घरी करा 'ही' ५ योगासने

Dengue during pregnancy: पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा धोका वाढतो, तज्ज्ञांनी सांगितलं गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT