RTO Choice Numer:  Saamtv
मुंबई/पुणे

RTO Choice Number: श्रीमंत पुणेकर! वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी खर्च केले लाखो रुपये; '१ लाख ८० हजार किंमतीचा नंबर कोणता?

Pune VIP Number Craze: वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लावण्यास कायद्याने मनाई आहे. मात्र तरीही वाहनचालकांमध्ये आकर्षक नंबरची क्रेझ कायम आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune VIP Number Auction: दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लावण्यास कायद्याने मनाई आहे. मात्र तरीही वाहनचालकांमध्ये आकर्षक नंबरची क्रेझ कायम आहे. विशेष म्हणजे याबाबतीत पुणेकर आघाडीवर आहेत. पुणेकरांनी आपल्या आवडीचा नंबर घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Latest News)

याबाबतीत अधिक माहिती अशी की, पुणे प्रादेशिक परिवहन (Pune RTO) कार्यालयात दुचाकी तसेच चारचाकीसाठी नवीन क्रमांकांची मालिका सुरू करण्याआधी त्यातील आकर्षक क्रमांकाचा लिलाव करण्यात आला. ज्याला पुणेकरांनी जोरदार प्रतिसाद दिला.

यावेळी पुण्यात (Pune News) दुचाकीसाठी असलेल्या नवीन क्रमांकाच्या मालिकेत मोटारींसाठी तिप्पट शुल्क भरून आणि लिलावात बोली लावून आकर्षक क्रमांकाची वाहनचालकांनी खरेदी केली. यावेळी आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी पुणेकरांनी लाखो रुपये खर्च केल्याचे पाहायला मिळाले.

सर्वाधिक बोली कोणत्या क्रमांकाला?

या लिलावात सर्वाधिक किंमत '१२१२' या क्रमांकाला दिली असून तब्बल १ लाख ८० हजारांत या क्रमांक इच्छूकाने खरेदी केला. तसेच '७०००' या क्रमांकासाठी १ लाख १ हजार इतक्या रुपयांची बोली लागली. त्या खालोखाल '००११' या क्रमांकाला ८१ हजार ७८६ रुपयांची बोली लागली. '०००५' या क्रमांकाला ७६,१०१ इतके पैसे पुणेकरांनी मोजले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT